कविता II दोन लाकडे वरती गेली , दोघीमध्ये अडकलो मी II

Started by siddheshwar vilas patankar, October 13, 2016, 01:15:42 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar



विटेवरी विट रचून

भिंत केली उभी

पलीकडे सोनुली राहिली

अलीकडे माझी माय माउली

भिंतीमध्ये सांधलो मी

भिंतीमध्येच बांधलो मी

टाळ मृदूंग अंगी बाणले

दोन्हीबाजूनी वाजलो मी

विठ्ठल विठ्ठल करी मुखाने

आत्ता तरी जगू द्या सुखाने

दोन लाकडे वरती गेली

दोघीमध्ये अडकलो मी

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C