कविता II नका करू इथे प्रकाश , मला राहू द्या अंधारात II

Started by siddheshwar vilas patankar, October 13, 2016, 06:26:01 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


नका करू इथे प्रकाश

मला राहू द्या अंधारात

मी माझ्या काळोखात

सुखे उभा II

दूर लावा तुम्ही दिवे

तेल टाका त्या दिव्यात

काढा वात ती बाहेर

माझं अंधार माहेर II

दिवे लावून शोधता

दिवे पाहून शोधता

तरी सापडत नाही

तुम्हा पाहिजे तो रस्ता II

इथे अंधार माखला

मी अंधार चाखला

वाट चालता चालता

सर्व रस्ता एक झाला II

सिद्धेश्वर विलास पाटणकर C




सिद्धेश्वर विलास पाटणकर C