किती गोड हसते ग तु .....

Started by k.suhas, October 15, 2016, 02:39:19 PM

Previous topic - Next topic

k.suhas

 किती गोड हसते ग तु .....
नजरेतुन सरळ याहृदयात वसते ग तु. . . . . . . .
किती गोड हसते ग तु .....


जसे तारकानी हे नभ सजवले, तुझ्या पावलानी हे जिवन फुलवले
तो चंद्र ही आज या विचारात आहे, अशी काय जादु तुझ्या हसण्यात आहे
चांदणी सारखी चमकते ग तु .....
किती गोड हसते ग तु .....  या हृदयात वसते ग तु . . .


पाहुन तुला ही उमलतात फुले, नजरेत तुझ्या माझे मन झुले
फुलपाखरु ही तुझ्या संग खेळी, डोलु लागती गुलाब जाई जुई
माझी फुलराणी शोभते ग तु .. .
किती गोड हसते ग तु .....  या हृदयात वसते ग तु . . . .


कधी वाटे मजला तु कृष्णाची राधा, तुझ्या संग रंगली ही जिवनाची गाथा
जसे निघते या बासरीतुन संगित, तुझ्याच साठी रचले लेखणीतुन गित
माझ्या नसानसात भिनते ग तु ..
किती गोड हसते ग तु .....  या हृदयात वसते ग तु . . . .


शब्द न शब्द हे अनमोल मोती, अजुन घट्ट व्हावी या रेशिम गाठी
तु शब्द अन मि सुर व्हावे, या प्रेम संगितात हरपुन जावे
माझ्या कवितेत रमते ग तु ..
किती गोड हसते ग तु .....  या हृदयात वसते ग तु . . . .


सुहास काकडे
[/size]
प्रा.सुहास काकडे
9272321306
suhas.kakde@gmail.com