तो परमेश्वर

Started by k.suhas, October 15, 2016, 02:51:17 PM

Previous topic - Next topic

k.suhas


तो फुला फुलात सुगंध भरतो
तो पाखराना आकाशात उंच उडवतो
पावसाच्या सरीमधे उन मिसळुन
निळ्या परद्यावर सप्तरंग दाखवतो

तो हसवतो तो रडवतो
तोच मारतो तोच जगवतो
या धरणीचे सुख दुख ऐकुणी
ढगानाही तो रडायला लवतो

तो काळ्या मातीतुन सोन पिकवतो
वार्याच्या तालावर पिकाना झुलवतो
पंच महाभुताचे ब्रश घेउणी
या निसर्गाचे सुंदर चित्र रंगवतो

तोच उठवतो तोच निजवतो
पाप पुण्य पण तोच लिहितो
आपल्या होण्याचे प्रमाण देण्यासाठी
या धरतीला तोच हालवतो

तो दिवस तो रात्र आहे
या ब्रम्हांडात तो सर्वत्र आहे
युगा युगाचा शिल्पकार तो
नियतीचे चक्र सदैव फिरवित आहे

तो धर्मा वर अधर्म चढु देणार नाही
आकाशात उडणार्या पाखाराना पडु देणार नाही
गर्भातच लेकिला संपविणारा माणसा हे लक्षात ठेव
तो तुझा पण वंश वेल वाढु देणार नाही


सुहास काकडे
प्रा.सुहास काकडे
9272321306
suhas.kakde@gmail.com