कविता II मास्तर म्हणतात पोरांना , पिरेम लय वाईट II

Started by siddheshwar vilas patankar, October 15, 2016, 04:14:54 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


मास्तर म्हणतात पोरांना

पिरेम लय वाईट

करू नका कधी तुम्ही

जाल सर्व खाईत II

झाडे लावा,  गुरे चारा

मायबापास पोसा

पिरमामध्ये हे शक्य नाय

मग का स्वतःस कोसा

पिरेम पिरेम करता करता

बिनपाण्याची झाली

सोन्यासारखी नोकरी जाउनी

घंटा हाती आली II

हाती छडी अन टोपी घेऊनि

सायकलवरूनी  येतो

डोक्याला मॉप शॉट लावूनी

परत घरी घ्यायला जातो II

पगारपाणी ना येळेवरती

घरी वाढला भांडणतंटा

छडी घेऊनि फक्त बडवितो मी

शाळेमधली घंटा II


सिद्धेश्वर विलास पाटणकर C




 
सिद्धेश्वर विलास पाटणकर C