आभार..!!

Started by Balaji lakhane, October 15, 2016, 05:20:15 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

--------------------आभार------------------

सर्व प्रथम माझ्या आई बाबांना माझे नमन,
त्यांनीच दिलं मला अस सुंदर बहुमूल्य जिवन.!

आज काय बोलावे काहीच समजतच नाही,
सर्वांचे आभार मानायला शब्द सुचत नाही.!

सर्वांचे माझ्यावर माये सारखा जिव्हाळा प्रेम,
आनंदाचे अश्रु ओघळत आहेत पाहून आपले प्रेम.!

मी खुप लहान आहे या कवितेच्या जगात,
कधी कधी असच लिहीतो वहीच्या पानात.!

सर्वच मान्यवर जपतात मला मुला सारखं,
मोलाचं मार्गदर्शन करतात आई बाबांन सारखं.!

आपल्या सर्वांच्या माये मुळचे मी लिहीत आहे,
असाच जिव्हाळा राहूद्या कायम मी लिहिणार आहे.!

-----तुमचा लाडका बालाजी लखने(गुरू)----

आपण मला  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलात......
सर्व मान्यवरांचे मित्र मैत्रीनीचे मनापासुन आभार.....