तुझं हसणं

Started by Asu@16, October 15, 2016, 06:13:27 PM

Previous topic - Next topic

Asu@16

तुझं हसणं

तुझं हसणं
फुलं उधळतात
त्याचं हसणं
गंध मिसळतात
तुझं हसणं
नाचणाऱ्या कारंज्यासारखं
त्याचं हसणं
धीरगंभीर डोहासारखं
तुझं हसणं
जगण्याला जान देणारं
त्याचं हसणं
जगण्याचं भान देणारं
असंच आयुष्य
फुलवित रहा
आणि जगणं
खुलवित रहा

- अरुण सु.पाटील
  (15.10.2016)

https://www.facebook.com/AsuChyaKavita