अंत

Started by vijaykumbhar, October 16, 2016, 09:44:03 AM

Previous topic - Next topic

vijaykumbhar

शब्द गोठूनी आले
कंठा जवळी
मनाचा अंत झाला...
पण मार्ग मोकळा
डोळ्यातूनी झाला....
शब्दांचे हे काहूर
मनात माझ्या उडत आहे...
मोकळे होण्यासाठी मात्र
आश्रुंचाच वेग आहे...
आठवाणीच्या त्या मळयात
दुःखच सारखे उमलत राही..
पालवी फुटावी भविष्याला
पण भूतकाळाचे भूत पाठीच उभे राही...