ओढ

Started by abhishek panchal, October 16, 2016, 09:55:02 AM

Previous topic - Next topic

abhishek panchal

आई ,
ओढ म्हणजे काय असत ,
ते आज मला समजलं
आठवणीच्या डोहामध्ये ,
मन पुरं भिजलं

तहान भूक झोप सारं ,
क्षणात परकं होतं
अनोळखी ते मोठं घर ,
गिळून मला खातं

मनात माझ्या उत्तरांचं ,
काहुर एक माजलं
आई,
ओढ म्हणजे काय असत ,
ते आज मला समजलं

गर्दी असते बाजूला ,
पण हाकेला तो ओ नसतो
दूर जाऊन उमगलं ,
एकटेपणा काय असतो

दूर जाऊन सहवासाच्या ,
किंमतीचं ते बीज रुजलं
आई,
ओढ म्हणजे काय असत ,
ते आज मला समजलं

आवाजाची किमया न्यारी ,
ओढीची ती तहान सारी
शब्द ऐकता तुझे ते सारे ,
होते जणू जादू प्यारी

आवाजातही ओढ असते ,
हे तुझ्याशी बोलून समजलं
आई,
ओढ म्हणजे काय असत ,
ते आज मला समजलं

            - अभिषेक पांचाळ , पुणे
               ( ९०२८८७५९५८ )