*****आता काहीच वाटत नाही…*****

Started by Shri_Mech, October 16, 2016, 02:11:03 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

आता काहीच वाटत नाही...


तू दूर झालीस,
न सांगता गेलीस,
सर्व गोष्टी संपल्या
अपवाद फक्त तुझा नकार
पण आता त्याचं काहीच वाटत नाही....


खूप अंधुक आशा होती
पहिल्यापासून जपलेली
शेवटी ती मातीमोल ठरली
जणू माझ्यासाठी नव्हतीच कधी
पण आता त्याचं काहीच वाटत नाही....


जरा जास्तच विश्वास ठेवला
मी माझ्या प्रेमावर
जन्माची अद्दल घडली मला
नको होतो एवढा चुकायला
पण आता त्याचं काहीच वाटत नाही....


प्रेम माझं मामुली ठरलं,
तिला ते कधीच ना समजलं,
नातं आमचं असं कोलमडलं
एका क्षणात मातीत गेलं
पण आता त्याचं काहीच वाटत नाही....


माहित आहे ही जखम
कधीच भरून येणार नाही
उगीच धावाधाव नको करायला
ती स्वतःला बदलणार नाही
पण आता त्याचं काहीच वाटत नाही...


आता फक्त एकच करायचं
सर्व आठवणींना दफन करायचं
कारण कितीही वाईट वाटलं तरी
ती माझी होणार नाही.....
म्हणून आता त्याचं काहीच वाटत नाही...

Shri_Mech
Shri_Mech

chaitanay shinde

khrch bhau kutun suchte rav kavita ...Its my true story😢😢Kharch sagl.brobr ahe

Shri_Mech

धन्यवाद चैतन्यजी,

यापेक्षा छान कविता, 'सोबत तुझा नकार' या नावाची, 'प्रवीण डुंबरे' यांनी लिहिली आहे. ती YouTube वर video च्या स्वरूपात उपलब्ध आहे. त्याची link share करतोय, आशा करतो कि तुम्हाला नक्की आवडेल.

https://www.youtube.com/watch?v=Rldell63TUQ
Shri_Mech