“Read between lines”

Started by विनायक आनिखिडी, October 16, 2016, 07:37:47 PM

Previous topic - Next topic
"Read between lines"

अर्थ दोन ओळी मधला,   मला कधी
कळला नाही, वळला नाही

नसलेल्या चुका दाखवुन,
शासकीय अधिकारी छळतो, तेव्हा
टेबलाखालचा मार्ग त्याचा,   मला कधी
कळला नाही,  वळला नाही

रस्त्यावरच्या अपघातात
विव्हळणारी लोकं पाहिली
हात दिला मदतीचा, तेव्हा
पोलिसांचा पंचनामा, मला कधी
कळला नाही, वळला नाही

गरीबाच्या झोपडीत
पाय पसरून जमिनी वर बसलो
श्रीमंतांच्या घरी देखील
शिष्टाचार,  विसरुन वागलो 
स्टेट्स म्हणजे, काय जपायचं ?  मला कधी
कळल नाही, वळल नाही

कारण शोधुन ती बोलत होती
विनोद नसताना हसत होती
लांब गेल्यावर वळुन बघत होती
अर्थ याचा काय घ्यायचा , मला कधी
कळला नाही, वळला नाही

नावं पडली बरीच यामुळे
साधा, भोळा, सरळ, तरीही
अर्थ दोन ओळी मधला,   मला कधी
कळला नाही, वळला नाही
                                      विनायक आनिखिंडी, पुणे