शिवछत्रपती माझा

Started by yuvrajpatil001, October 17, 2016, 11:02:24 PM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

माझा राजा...माझा अभिमान
शिवछत्रपती स्वाभिमान...

तुजमुळे कृतार्थ जाहले हिंदवी स्वराज्य..,
कारण तुज होती 'भवानी माता' पूज्य...

वरदान तुज तिचे लाभले..,
समशेरीत असे तेज सामावले...

खेळतो रणसंग्राम
मावळ्याची ती स्वामिनिष्ठ साथ
अन सोबत...गनिमी कावा..,
आई जिजाऊचा तो छावा...

पावित्र्य राखिले प्रत्येक धर्माचे..,
प्रतिक भगवा असले तरी
तत्व मात्र ऐक्याचे...

तुझ्या किर्तीसम कोण न साजे..,
सूर्य हि तुझ्या प्रखरतेस लाजे...

तुज माथ्यावरील चंद्रकोर ग्वाहि देई..,
हिंदवी स्वराज्य हे कले_कलेने वाढत जाई...

मुद्रेवर शब्द कोरिले खास..,
लोककल्याणाचा तुज होता ध्यास...

किती वर्णू तुज...वर्णाया शब्दची जाहले अबोल..,
ज्या 'मातीत' सांडिले रक्त तुझे अन मावळ्याचे
फक्त कपाळी लावून नाही कळणार तिचे आम्हास मोल...

त्यागाची नी राष्ट्रप्रेमाची प्रचीती अशी न यावी आम्हा..,
या मराठी भूमीत जन्मावा तू ...पुन्हा पुन्हा...

चहूकडे पाहता महाराष्ट्रदेशा ..,
दिसेल तुम्हास शिवाजी राजा...

गर्जा महाराष्ट्र माझा ...
शिवछत्रपती माझा...""


युवराज..."