कविता II विषन्न होतंय मन बघून , जिथं तिथं निवडुंगच फुललंय II

Started by siddheshwar vilas patankar, October 18, 2016, 12:15:58 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

विषन्न होतंय मन बघून

जिथं तिथं निवडुंगच फुललंय

आरं लावा चंदन मोगरा

मला जाताना बी दरवळायचंय II

सव्यापसव्यय पुरे झाला

पुरे पुरे तो गृहस्थाश्रमाचा काला

झिजलो बहुत मी आता

आत्ता त्राणच नाही उरलंय

लावा मोगरा न केवडा सुगंधी

मला जाताना बी दरवळायचंय II

कोलाहल आतसुद्धा कोलाहल तो बाहेर

विसरलोय मी कोकिळेचा गोड मंजुळ स्वर

दानापाण्याचा बाजार झालाय

शब्दच्छलांचा वाढलायं जोर 

आरं कुणी बोलवा किलबिलाटास

मला त्याच्यासंगंच रहायचंय II

नको ती वैकुंठभुमी

नका करू दहन मजला

पुरा मज चंदनाच्या झाडाखाली

त्याच्या फांदीतूनच वर जायचंय

लावा चंदन मोगरा

मला जाताना बी दरवाळायचंय II


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C