हसतेस अशी तू जेव्हा

Started by k.suhas, October 19, 2016, 02:25:39 PM

Previous topic - Next topic

k.suhas

हसतेस अशी तू जेव्हा 
मन पक्षी बनुनी उडतो 
हे क्षणात विरते अंतर 
मी तुझ्या भोवती बागडते
हसतेस अशी तू जेव्हा ............

जसा पहिला पाऊस पडावा
प्रेमाचा वर्षाव होतो 
हे मनात फुललेले अंकुर
गुलमोहर सारखा बहरतो 
हसतेस अशी तू जेव्हा ............

दिसतास अशी सामोरी
नायनाची प्रतीक्षा संपते 
श्वासांची वाढते धडपड
नजरेचा खेळ सुरु होतो 
हसतेस अशी तू जेव्हा ............

तू सांग प्रिये माझं काय
मी सांगू या संसारा 
रात्रीचा चंद्र तो नभात
चांदणीची प्रतीक्षा करतो 
हसतेस अशी तू जेव्हा ............

हसतेस अशी तू जेव्हा 
नवा वसंत मनात फुलतो 
दाही दिशा उजळणारा
प्रेमाचा प्रकाश पसरवतो 
हसतेस अशी तू जेव्हा .........

सुहास काकडे
9272321306
प्रा.सुहास काकडे
9272321306
suhas.kakde@gmail.com