कविता II गणूस मरणाची लगीनघाई , घाईत उरकलं सर्व काही II

Started by siddheshwar vilas patankar, October 19, 2016, 05:19:28 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar



गणूस मरणाची लगीनघाई

घाईत उरकलं सर्व काही

आई बापाचं काही ऐकलं नाही

आणली घरात नवीन बाई II

गणू ,नवा तरणाबांड खेळाडू

घेऊनि उभा नवीन दांडू

मधुचंद्राची वाजता शिट्टी

बाईंनी काढली वापरलेली विटी II

मारे धरुनी दांडू ,

काढुनी जो जोर

बाई समजे पोर , गणूस

ओशाळला, ढेपाळला बाईसमोर

बाई सांगे नियम

कसा काढावा दम , समोरासमोर II

त्यास बाई वाटे थोर

पण असे मोठी चोर

मनी नाचे मोर

सापडे फुकटात चाकर

जणू दुधात साखर , माझ्यासाठी II

भेटला मज पांडू

नवा कोरा घेऊनि दांडू 

मनापासून शिकवेन

कसा खेळायचा विटीदांडू II

गणू चाट मनोमनी

त्यास नाही ध्यानीमनी

आपल्यासंगे जी राणी

असे  खेळात बहू जुनी II

रोज नवीन प्रकार

मनी अनेक विचार

गणू लावी नित्य घोर

गणू दाबे सदा मना , पाळे सदाचार II

गणू सासरी जो जाई

सारी गोष्ट ध्यानी येई

नडली लग्नाची घाई

साधीसुधी नव्हे हि बाई II

गणू फसला फसला

गणू रुसला रुसला

गळा माळ धारण करुनि

संन्यासी मग झाला II


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C