दगड होऊन जन्मू दे..,

Started by Ravi kamble, October 21, 2016, 12:08:18 AM

Previous topic - Next topic

Ravi kamble

◆ दगड..,

जन्म झालाच पुन्हा 
तर दगड होऊन जन्मु दे
पाषाणाला कोरुन
देह रेखीव माझा घडु दे

पिकवुन कष्टाने सारे
शेतकरी सदैव उपाशी
दगड होऊन जन्मलो
तर खाईन सदैव तुपाशी

चिंतेने माय व्याकुळ
कधी मिळेल दुध बाळाला
दगड होऊन जन्मलो
तर कमी नाय इथं अभिषेकाला

जगने झाले मुश्किल
ना वास अंगा गंधाचा
दगड होऊन जन्मलो
तर सहवास मिळेल चंदनाचा

आयुष्य सरले तरी
हाती सदा अंगार
दगड होऊन जन्मलो
तर चढेल सोन्याचांदीचा साजशृंगार

कितीही धरती फाटली
वा कितीही पुर वादळ वाहिल
दगड होऊन जन्मलो
तर सदैव आबादित राहील.

रविंद्र कांबळे 9112143360
व्हाट्सप क्रं . 9970291212

maheshkarpe4

Khup chaan kavita ahe.... Faar avadli.. Masttt
👌👍