!! आरती श्री स्वामी समर्थ !!

Started by शिवाजी सांगळे, October 21, 2016, 01:37:29 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

!! आरती श्री स्वामी समर्थ !!

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
तुम्हा कृपेने, जीवन आमुचे होउ दे सार्थ!!धृ!!
 
कृपा तुमची सदैव असता, ना हो कुणी कष्टी
राहुनी अक्कलकोटी, असते आम्हावरी दृष्टी
गाउ किती, वर्णु किती, करू किती स्वार्थ
तुम्ही दिला, तुम्ही घडविला, जीवनासी अर्थ
 
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
तुम्हा कृपेने, जीवन आमुचे होउ दे सार्थ !!१!!
 
भिऊ नकोस म्हणता, नेहमी पाठीशी असता  
संकट समयी, बळ देउनी, चिंता मिटविता
वेळोवेळी मार्ग दावूनी, दिले कृपा तिर्थ 
होउन आता कृष्ण, करावे शिवास कृतार्थ

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
तुम्हा कृपेने, जीवन आमुचे होउ दे सार्थ !!२!!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

siddheshwar vilas patankar

सिद्धेश्वर विलास पाटणकर C

शिवाजी सांगळे

पाटणकरजी खूप आभार, सर्व स्वामींची कृपा, त्यांनी करवून घेतले सर्व काही, आपण चाल बसविली असेल तर मला जरूर कळवा, आनंदच होईल, माझा मोबाईल नंबर देत आहे आवश्य कळवा ९४२२७७९९४१ व ९५४५९७६५८९, पुनश्चः आपले आभार.
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९