परी माझी ......

Started by विजय वाठोरे सरसमकर, October 21, 2016, 07:53:04 AM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर


परी माझी


तुलाही आता
कळाच्या माझ्या व्यथा
प्रेमाची कथा

उनाड जगी
तुझीच होती छबी
अंतरी उभी

कळेना मला
प्रेमाचा हा ग डाव
अंतरी घाव

जखमांना या
विसरलो मी आता
विरही जाता

तुला कळेना
माझ्याकडे वळेना
नजर तुझी

हट्ट तू सोड
परी माझी तू गोड
जीवनी तूच

तू असतांना
नसतो ग मी माझा
पूर्णतः तुझा

वेळी अवेळी
जुळवतो मी ओळी
तुझ्याच साठी

विजय वाठोरे सरसमकर
(साहिल )
हिमायतनगर जि.नांदेड
9975593359