तू

Started by abhishek panchal, October 21, 2016, 09:13:53 AM

Previous topic - Next topic

abhishek panchal

डोळे मिटता परी , तू समोर माझ्या येशील
उघडता मी डोळे , तू गायबही होशील
जादू असेल काही , तुझ्या येण्या जाण्या मध्ये
पूर्णपणा असेल , माझं तुझं होण्यामध्ये

तू ,
या माझ्या स्वप्नातली परी ,
कि अशीच कुणीतरी

महाल तो सजला , सूर सनई घुमले
मांडव तोरणे लावून , दार उंबरठे जमले
माझ्या हृदईचा खेळ , तुला राणी करतो आहे
तुझ्याविना हरदिनी , दरबार भरतो आहे

तू ,
या माझ्या स्वप्नातली राणी
कि ओळखीतलीच कुणी

लग्नाच्या गाठी म्हणे , स्वर्गातच जुळतात
अन याच गाठी पृथ्वीवर जुळवणारे agent , अगदी गल्लो गल्ली मिळतात

पण असा कुठला agent , भेटला नाही मला
जो माझ्यासाठी कोठूनतरी , शोधून देईल तुला

तुला भेटला कोणी , तर हाक मार मला
धावत येईन लगेच , हा शब्द तुला दिला

मला तू हवी आहेस , मग ती राणी असो परी
स्वप्नात येणारी असो , वा असो कोणीतरी

                        - अभिषेक पांचाळ  , पुणे
                            ( ९०२८८७५९५८ )