कविता II फक्त एकदाच दिसली होतीस II

Started by siddheshwar vilas patankar, October 21, 2016, 01:57:58 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


फक्त एकदाच दिसली होतीस

डोळ्यांनी हेरलं

मनात कोरलं

नावं तुझं , कायमचं II

तुम्हाला "लैला " का म्हणतात

हे पटकन समजलं , क्षणात

ना कसली शिकवणी लावली

ना कुठली पदवी घेतली

सारण तयारच होतं

तुला बघून तळलेली करंजी झाली II

ना तेलाचा वास उरला

ना कसला आवाज आला

एका क्षणात तयार झालं

निव्वळ तुझ्या भेटीचा ध्यास उरला II

आम्हाला " मजनू " का म्हणतात

ते पण समजलं

हळूहळू साऱ्या दुनियेशी बिनसलं

आतल्या आत काळीज अस्संच जळत गेलं  II


सिद्धेश्वर विलास पाटणकर C





सिद्धेश्वर विलास पाटणकर C