कविता II जर आवडली एखादी परी , तर ठेवावी नीट स्वारी II

Started by siddheshwar vilas patankar, October 21, 2016, 02:25:33 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


जर आवडली एखादी परी

तर ठेवावी नीट स्वारी

सदासर्वकाळ सप्तवारी

तिला काय हवं नको ते पाहावे

जाणावी तिची आवडनिवड

त्याप्रमाणे आखावे डाव पुढले

अन उभारावा प्रेमाचा गड , हळूहळू

विटेपासून मातीपर्यंत

करावी भक्कम तटबंदी

कुणी परपुरुष बोललाच तिच्यासंग

तर गोडीगुलाबीनं करावी त्याची नाकेबंदी

केवळ ठेवावे तुमचेच ध्यान

नजरेसमोर तिच्या

असं म्हणतात "तेच तेच बघून सवय होते "

वाटू लागतो जवळचा कुणी

शोधू लागता तिची नजर तुम्हास

समजून जा " आपलंच दूध अन आपलंच लोणी "

तारीख ठरता लग्नाची

फेकून द्या पावडर न फणी

ठेवा कशी पण राहणी

कहाणी होता जुनी


सिद्धेश्वर विलास पाटणकर C

सिद्धेश्वर विलास पाटणकर C