श्वास

Started by Rupesh Gade, October 21, 2016, 07:58:25 PM

Previous topic - Next topic

Rupesh Gade

शब्दांच्या बंधनात आडकलोय , एकदा तरी सोडवशील, डोळयांचा ही बांध फुटला, अजून किती रडवशील,
तुला जाताना बघून निसर्ग हि पावसाच्या रूपाने गात होता ,
पण नंतर कळाले पाऊस तर माझ्या डोळयांच्या आत होता,
जे जमले नाही माझ्या ओठांना, ते माझ्या नजरेने केले ,
आणि माझी कविता वाचून तुझ्या चेहऱ्यावर हसू आले,
आता नकोस आडवू स्वतःला आनंदी होताना,
कारण तुझाच चेहरा आठवतो मला प्रत्येक श्वास घेताना।
                                                   
                                                  - रुपेश मारुती गाडे.