तु आणि तुझी ओढ

Started by ηأκнأl η. βοlε, October 21, 2016, 08:44:11 PM

Previous topic - Next topic

ηأκнأl η. βοlε

ओढ तुझी अशी होती,
सत्यात तु जशी होती...
प्रेमाच्या विश्वात सखे,
अप्सरा तु जशी होती.

कशी तुझी ओढ सखे,
रमुन तुझ्यात असा गेलो...
तुझाच चेहरा बघाताना,
हरवुनी तुझ्यात असा गेलो.

आयुष्यात असं वाटायचं,
फक्त तुझीच हवी साथ...
शेवटच्या श्वासा पर्यन्त सखे,
निष्ठावंत असलेली एक गाठ.

पण विचार जसा मी केला,
तसे कधी घडलेच नाही...
तुझा साथीदार म्हणून तु,
कधीच मला नेमले नाही.

प्रेम नसुन तुझं माझ्यावर,
का तु अशी वागायचीस...
तु माझा आहेस म्हणून,
भ्रमात मला ठेवायचीस...

गेलीच शेवटी तु,
मला एकटं असं सोडून...
तुझ्या प्रेमळ आठवणी,
माझ्या मनात साठवून.

तुच सांग प्रिये आता,
प्रेम माझं कसं विसरु...
तुझ्याच विश्वात हरवलेल्या,
मनाला मी कसं सावरु.

शेवटी अशृंचे झरे ही,
डोळ्यांमधून वाहतात...
प्रेम माझं खरं होतं,
खरोखर ते सांगतात.

आता तुझ्याविना अर्थ सखे,
जीवनात माझ्या नाही...
तु आयुष्यात नासताना,
आयुष्य ही माझं नाही...
आयुष्य ही माझं नाही...

Nikhil
8550951989