मितवा..तुझा"

Started by yuvrajpatil001, October 22, 2016, 07:50:28 PM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

चेष्टा-मस्करी..रोजचीच
नाराजगी-रुसवा ही रोजचाच
मितवा हा तुझा... फक्त तुझाच

ओढ-आठवण  रोजचीच
जीव-भाव रोजचाच
मितवा हा तुझा... फक्त तुझाच

खंत-यातना रोजचीच
बंध-गंध रोजचाच
मितवा हा तुझा... फक्त तुझाच

प्रीत-रीत रोजचीच
आस-ध्यास रोजचाच
मितवा हा तुझा... फक्त तुझाच

चूक-भूल रोजचीच
श्रद्धा-विश्वास रोजचाच
मितवा हा तुझा... फक्त तुझाच

साथ-गाठ रोजचीच
प्रेम-जिव्हाळा रोजचाच
मितवा हा तुझा... फक्त तुझाच

युवराज पाटील" (पुणे)