साथ माझी देशील का..?

Started by yuvrajpatil001, October 22, 2016, 07:53:22 PM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

राणी..,

तुला नेहमी विचारावसं वाटत की..,

जर माझ्याकडे पैसा नसेल.. वैभव नसेल
तरी तू माझी साथ देशील का..?
माझ्या हातात हात घेऊन चालशील का..?

जर तुला माझ्यासोबत वाटेत चालताना
हालपेष्टा..त्रास सहन करावा लागला
तरीदेखील तू खुश आहेस असं मानशील का..?

जर मी कधी रागावलो आणि नंतर तुझ्याजवळ आलो
आणि मला माफ कर असं म्हणालो तर
माफ मला करशील का..?

कधी मी रडलो...गहिवरलो
वेदनेने ओरडलो तर
मला स्वतःच्या मिठीत घट्ट सामावून घेशील का..?

तू दूर जरी असलीस माझ्यापासून तरी
तू माझीच आहेस हे समजून
आयुष्य घालवशील का..?

खरं सांगशील... जन्मभर साथ माझी देशील का..?
साथ माझी देशील का..?

युवराज पाटील (पुणे)