प्रेम"

Started by yuvrajpatil001, October 22, 2016, 07:58:14 PM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

पिल्लू...

कधी जर तू मला विचारलंस ना
कि माझं कित्ती प्रेम आहे तुझ्यावर

तर तुला इतकाच सांगेन
कि...तसं ते मला शब्दात नाही सांगता येणार

आणि जर शब्द मिळालेच तर ते हेच असतील
कि...

माझं अस्तित्व म्हणजे तू
माझा श्वास... माझं हृदय
माझं मन तू...अन त्याची आसही तू
माझं जीवन तू..माझं स्मरण तू
माझं ऊन तू...तसंच माझी सावलीही तूच
माझा पाऊस तू... अन भिजणं ही तूच
माझी थंडी तूच.. अन घट्ट मिठीतली ऊब ही तूच

राणी... खरच बघ इतकं प्रेम आहे तुझ्यावर
कदाचित शब्द अपुरे पडतायेत
पण मला माफ कर हा..

कारण अत्ता.. मला गहिवरून आलंय
ते कसये ना..
तुझ्या प्रेमात.. हे डोळे पण स्वार्थी व्हायला लागलेत
वेडे उगाचच पाणी ढाळत बसतात
...
तरी कित्ती समजावतो मी त्यांना
पण काही ऐकत नाहीत ते

ते म्हणतात.. अत्ता तिच्या ओठांचा जेव्हा स्पर्श होईल ना
तेव्हाच अश्रू बंद होतील

बघ ना... बाबू
कस समजावू मी ह्यांना

जाऊदेत..अजून काय बोलू मी
ओठही अत्ता अबोल झालेत"


युवराज पाटील (पुणे)

jaydrath kesbhat

like this poem and answer 5+5+0= 10

jaydrath kesbhat