ना उरेल..ना संपेल"

Started by yuvrajpatil001, October 22, 2016, 08:01:40 PM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

पिल्लू...

जेव्हाही देवळात जातो ना
तेव्हा एकचं विचार करतो
मला तुझ्यासाठी हे मागायचंय ते मागायचंय

पण नंतर विचार येतो..,
त्याने तर मला आधीच सर्वकाही दिलंय

एक सांगू.., ज्या देवाने आपल्याला जवळ आणलंय ना
त्या देवाची शपथ घेऊन सांगतो..,
मी तुझी साथ कधीच सोडणार नाही

तू रुसलीस..रागावलीस..कितीही हट्टाला पोचलीस
तरी मी तुझे सर्व लाड पुरवेन...

खरं तर.. कधी कधी मला वाटतं
मी जेवढी तुझी काळजी घेणारं नाही.,
त्यापेक्षा तूच मला जास्त जपशील.. जीव लावशील

राणु...मी हे जाणलंय गं.., तुझ्याइतक प्रेम
माझ्यावर कुणीच करू शकणार नाही

अडथडे येतील.. त्रास होईल..
पण तू मला समजून घेशील
आणि मी तुला

कारण तुझ्यात नी माझ्यात फक्त दोन शरीरांचा फरक आहे
पण जीव तर एकचं आहे ना रे..,
आपलं हृदय पण सोबतच धडकंत ना

वर्ष जातील..काळ बदलेल..नाती बदलतील
खुपकाही गोष्टी बदलतील
पण तुझ्यावरच जे माझं प्रेम आहे ना
ते मात्र तसंच राहील..,
अगदी चिरतरुण...ना उरेल..ना संपेन

युवराज पाटील (पुणे)