माझ्यासाठी 'तू'

Started by yuvrajpatil001, October 22, 2016, 08:06:54 PM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

राणी..,

मला घरी आणलेली मिठाई
आणि देवासमोर ठेवलेली तीच मिठाई
यातील फरक चांगलाच माहितीये

तू माझ्या आयुष्यातील ती
देवासमोरील मिठाई आहेस
त्याने मला दिलेला 'प्रसाद'

ज्याला मी नेहमी माझ्या डोक्याला लावेन
पण ..खाणार नाही
आयुष्यभर जपेन त्याला

उचित मानसन्मान देईल
माझ्या दोन्ही हातांमध्ये सांभाळून ठेवीन
कारण 'तू' आयुष्यच देणं आहेस माझ्यासाठी"

युवराज पाटील (पुणे)