वाट तुझी मी पाहतोय"

Started by yuvrajpatil001, October 22, 2016, 08:11:46 PM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

तुझ्या आठवणींनी मनमर्जी केलीये
डोळ्यात आसवांनी गर्दी केलीये

गुंतायला काय गं..
हे मन केव्हाचं गुंतलय
जीव जातोय रे माझा..
जस आयुष्य माझं खुंटतय

दुरावा तर नेहमीचाच
सवय तुझी झालीये
एकांत सुद्धा नेहमीचाच
प्रीत तुझी जडलीये

ये रे सर्वांना सोडून
बघ तरी कसा जगतोय
तुझ्याच मार्गाचा ध्यास धरून
वाट तुझी मी पाहतोय

राणी.., वाट तुझी मी पाहतोय"

युवराज पाटील (पुणे)

विजय वाठोरे सरसमकर


vikrams13

Vnsarak