सवंगडी

Started by Rupesh Gade, October 22, 2016, 09:28:42 PM

Previous topic - Next topic

Rupesh Gade

जेव्हा मैत्रीचे जुने दिवस आठवतात, तेव्हा आपोआप हे दोन डोळे अश्रूने दाटवता, रात्री अपरात्री गप्पा गोष्टी रंगायच्या, तर कधी स्वप्नातल्या गोष्टी मित्रांना सांगायच्या,
एखादा मित्र आज वाट चुकला म्हणून दिवसभर त्याचाच विषय राहायचा, पण किती हि झाले तरी प्रत्येक क्षणाला त्याची वाट पाहायचा, कधी मोठे झालो हे कोणाला हि कळले नाही, आणि लहानपणा नंतर शाहानपन हे एकालाही टळले नाही,  बालपना पासून तरुणपना पर्यंत खूप अंतर झाले,आणि दप्तराचे ऑफिस च्या बॅग मध्ये रूपांतर झाले, आता प्रत्येकाचा प्रवास वेगळा होता, आणि त्या प्रवासात प्रत्येकाचा ध्यास वेगळा होता, आता चुकून कधी तरी  एकमेकांना भेटायचो, आणि फक्त तोंड ओळख असल्या सारखे बघून हसायचो, कधी कधी मनात विचार यायचा हाच का तॊ मित्र जो दिवसभर आपल्यासोबत असायचा, आणि रात्री दारू घेऊन सोबत प्यायला बसायचा,आता मना प्रमाणे  घराला हि दुरावा आला, आठवतात आता ते दिवस जेव्हा एकत्र राहायचो आणि दिवाळी पासुन होळी पर्यंत प्रत्येक सणाची आतुरतेने वाट पाहायचो, आता ते दिवस फक्त स्वप्नात रंगतील, आणि ते मित्र फक्त आठवणीत मध्येच जमतील, का कुणास ठाऊक असे वाटते की, काळाने पुन्हा एकदा मागच्या दिशेला झेप घ्यावी, आणि आम्हाला लहानपणाशी भेट द्यावी.   
                   
                                                 - रुपेश मारुती गाडे.