तू असताना"

Started by yuvrajpatil001, October 23, 2016, 01:50:28 PM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

तू असताना..

शब्दांची सांगड घालणं कधी जमलच नाही
तोडक मोडकं बोलून वेळ मारून नेणं कधी जमलच नाही

तू असताना..
डोळ्यात डोळे घालून तुला बघणं कधी जमलच नाही
एकटक बसून तुला न्याहाळंन कधी जमलच नाही

तू असताना..
माझ्या मनातलं तुला सांगणं कधी जमलच नाही
तुला माझी समजताना तुझ्यावर हक्क दाखवणं कधी जमलच नाही

तू असताना..
तुझा हात हातात घेऊन 'तू माझीयेस' हे सांगणं कधी जमलच नाही
तुला मिठीत घेऊन आपल्यातलं अंतर कमी करणं कधी जमलच नाही

तू ..मी...,  मी..तू
यामधे तुला 'आपण' शोधणं कधी जमलच नाही
खरच.. माझ कित्ती प्रेम आहे तुझ्यावर हे तुला कधी कळलंच नाही"

युवराज पाटील (पुणे)