माझे दोन्ही गुरू नगरनिवासी...

Started by Ankush S. Navghare, Palghar, October 24, 2016, 07:45:13 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

माझे दोन्ही गुरू नगरनिवासी
एक आहे योगीराज
एक आहे अखंड सन्यासी
एक मज दावितो सुपंथ
एक शक्ती चालावयासी
माझे दोन्ही गुरू नगरनिवासी
एक राजा ब्रह्मांडाचा
एक त्रैलोक्य व्यापीसी
एक देतो अन्नछत्र
एक लावे मार्गासी
माझे दोन्ही गुरू नगरनिवासी
एक देतो दृष्टी मजला
एक नजर पाहावायासी
एक देतो भक्ती मजला
एक येतो तारावयासी
माझे दोन्ही गुरू नगरनिवासी
एक संकटांतून सोडवी
एक शत्रू हारावयासी
एक माझ्या चराचरी वसे
एक माझा हृदय अधिवासी
एक माझा हृदय अधिवासी
माझे दोन्ही गुरू नगरनिवासी...

.... अंकुश नवघरे
दि . 24।10।2016.