आठवतो तो कॉलेजचा पहीला दिवस...

Started by Jayjeet, October 24, 2016, 08:57:14 PM

Previous topic - Next topic

Jayjeet

  आठवतो तो कॉलेज चा पहीला दिवस
ज्या दिवशी पाहील होत मी तुला,
  एक दिवस तुझ्याच प्रेमात पडेल
असं कधी वाटलं नव्हत मला।

  कधी आपली मैत्री झाली ना कळालं मला ना तुला,
  पण तुझ्याशी बोलता बोलता विसरून गेलो मी स्वतःला।

  पाहता पाहता एक दिवस विचारले मी मनाला,
  मनाने हळूच उत्तर दिले, प्रेमात पडलास तू सांगून टाक तिला।

  खुप दिवस निघुन गेले तरी सांगितले नव्हते जीवाचे हाल तुला,
  तुझ्याही मनाचे होतात का हाल हे जानून घ्यायचं होत मला।

  एक दिवस धाडशी मन करुन  विचारले मी तुला,
  आणि ऐकुन तुझं उत्तर खुपच त्रास झाला गं मला।

  "वेडा आहेस का तू?" असं म्हणलीस तू मला,
  पण वेडा मी नसून माझं मन आहे, खरं सांगतो तुला।

  म्हणशील कधीतरी हो आहे विश्वास मनाला,
  खरं सांग ना गं, काहीच वाटत नाही का तुला?

  आठवणींमध्ये तुझ्या राहण्याशिवाय आता पर्याय नाही मला,
   ए पिल्लू ! एक दिवस समजुन घेशील ना गं तू मला।

....Jayjeet