कविता II असं म्हणतात थेंबाने तळ साचत II

Started by siddheshwar vilas patankar, October 25, 2016, 04:42:41 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


असं म्हणतात थेंबाने तळ साचत

म्हणून का थेंबच टाकत राहायचं

अन आयुष्य पणाला लावायचं ?

का जगायचं बेफान होऊन

ढगांना लगाम घालून

गगनाला वेसण बांधून

तळ  भरायचं

तुम्ही थेम्ब टाकत राहा , मोजत राहा

तळ भरतंय का ते बघत राहा

आयुष्यभर कुढत राहा , दुसऱ्यांसाठी

समजून त्यांना म्हातारपणाची काठी

स्वतहा काठी बनला नाहीत

ज्यांनी वाढवलं त्यांच्यासाठी

आता थेम्ब टाकत राहा दुसऱ्यांसाठी


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C