फक्त तुझ्यासाठी

Started by Rupesh Gade, October 25, 2016, 09:19:44 PM

Previous topic - Next topic

Rupesh Gade

तुझ्या भेटीची ओढ काही जात नाही,
मीच काय तर माझे मन हि तुझ्या वाचून राहत नाही,
एकदा फक्त येऊन बोल, मनाच्या वेदना तुझ्या समोर सांगायच्या आहेत,
आणि न बोललेल्या भावना तुझ्या समोर मांडायच्या आहेत,
अजून हि तू समोर आल्यावर काळजाचे टोके चुकतात, आणि हृदयाचे पारडे हि तुझ्याच बाजूने झुकतात,
एकदा येऊन भेट सर्वशी निर्णय तुझा असेल,
आणि त्या निर्णयाला पूर्णपणे स्वीकार माझा असेल,
तू नक्की येशील कारण खऱ्या प्रेमाचा तुला हि मान आहे, शेवटी हृदयाचा एक भाग तुझ्या जवळच गहाण आहे।

                                                 -रुपेश मारुती गाडे.