भंगार

Started by शिवाजी सांगळे, October 25, 2016, 11:16:47 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भंगार

भांगारवाल्याच्या हाळी ने झोप उघडली
बराच दूरवर होता तो...
तरी जागं करून,
जाणिव देऊन गेला,
गोळा करा...
जवळ असलेलं सारं भंगार
काही कपाटात असलेलं
कुठे देवळीत कोंबून ठेवलेलं?
स्वयंपाक घरात...
कुणास ठाऊक काय काय होतं?
प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या,
अनेकविध रँपर्स,
दिसणारं तर सारं गोळा केलं,
फक्त, त्याची वाट पहात होतो! पण
नाही आला तो... मी सुन्न झालो,
त्याचा राग पण आला खूप...
नंतर लक्षात आलं,
अरे, हे सगळ दिखाऊ तर आहे...
मनात जे साठलयं त्याचं काय?
ते तर काढायलाच हवं,
वास्तवात भंगार म्हणजे...
स्वार्थ, मोह, लालच,
द्वेष व अहंकार हे आहेत...
त्यांना फेकायला हवं,
आणि मी...
भंगारवाल्याला शोधत होतो
जो जागेवरच होता
सारं भंगार जमा करून...

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९