नाती

Started by शिवाजी सांगळे, October 25, 2016, 11:21:33 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नाती

नात्यांची ओल
अनुभवायची होती...
सर्वच ईस्पित साध्य होत नसतात
चाचपडून पहिली तरी...
काय शोकांतिका आहे ना?
वृध्दाश्रमात अनुभवला
अनोळखी लोकां सोबतचा आपलेपणा,
त्या थकलेल्या,
वाट पाहणाऱ्या डोळ्यांतून !
बेदिक्कत जुळले... त्याचे सुर...
अनोळखी नात्यासोबत...
काही हरवण्याची भीती?
पोटाची भूक?
बहुदा नाहीच, तसं ही...
आधी बरचं काही...
सुटल गेलय...
त्या सुरकुतल्या हातांतून...
आणि मग, शरीर?
ते तर त्यागतच असत ना?
प्रेम, आपुलकी सोडून...
सर्व बाह्य गोष्टींना...?
नाळ व रक्ताशी जुळलेली नाती
जीथे तुटतात,
मग...
कुणाशी जुळणार नाती?

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९