कविता II सालं इरसाल हाय जिणं II

Started by siddheshwar vilas patankar, October 26, 2016, 06:03:05 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


सालं इरसाल हाय जिणं

रोजचं टेन्शन

इवलीशी कमाई अन

टिचकीभर पेन्शन II

रोज जातो कामावर

डबा डुबा घेऊन

रंगत सारी उतरून जाते

ढीगभर काम करून II

दिवसातून दहा वेळा

साहेबासमोर जातो

डब्याआधीच पोटभरून

भरपूर शिव्या खातो II

वाहतो लाखोली वाहतो

त्याच्या नावानं

ज्यानं जन्माचं दान दिलं

अन साहेबाला शिव्यांचं वरदान दिलं II

थकून भागून निघतो जेव्हा

परतीस माघारी

रंगत जमू लागते हळूहळू

चेहऱ्यावर न्यारी

दुसरं काही नाही मित्रानो

माझ्या छकुल्याची स्वारी II

हसत खेळत हिंडणारं

माझं लडिवाळ पाखरू

सायंकाळ होताच आईशीला

लागतं माझ्याबद्दल विचारू

जेव्हा दरवाजा वाजवतो

बरोब्बर आवाज ओळखतो

दरवाज्यावर धावतो, स्वागतास II

त्याचं मुरडणं , ती दारावरची अडवणूक

घरात आल्यावर विश्वचषक जेत्याप्रमाणे काढलेली मिरवणूक

उद्या छान छान  खायला आणतो ,

असं सांगून केलेली फसवणूक

सारं दिवसभराचं टेन्शन हवेत विरतं

संध्याकाळचं आयुष्य छकुल्याभवतीच फिरतं II


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C