कविता II गडे , जर वाटतो मी तुला मन चकोर II

Started by siddheshwar vilas patankar, October 26, 2016, 07:05:37 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


गडे , जर वाटतो मी तुला मन चकोर

का बोलतो तुझा बाप मला चोर ?

असशील तू एकुलती एक

मी पण चोख , शंभर नंबरी

तू आडवी आलीस म्हणून

नाहीतर असती माझ्यासोबत कुणी परी II

अर्रे , ह्रितिक शाहरुख येऊन भेटले

त्यांनी म्हंटलं म्हणूनच

अभिनेता व्हायचे टाकले

सांग तुझ्या बापास

मुकशील एका राजबिंड्यास

वर म्हणतोय मला चोर II

अस्सा जावई मिळत नाही

माझ्यावाणी "सवाई" तर मुळीच नाही

तुझी पुण्याई म्हणून मी राहिलो

तुझ्यापाशी

नाहीतर बसली असतीस

कुणा घिनाडासंगे मारत माशी II


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C