कधी कधी वाटतं...

Started by Jayjeet, October 26, 2016, 11:46:48 PM

Previous topic - Next topic

Jayjeet

कधी कधी वाटतं...
     की त्या ढगामध्ये जाऊन बसावं, एक छोटासा थेंब होऊन. काही दिवस तिथेच रहावं, तुझी आठवण काढंत. तुला भेटण्याची आस मनाला लावून बसावं.
      जेव्हा तु घरातून बाहेर येशील ना तेव्हा हळूच ढगातून उतरावं, आणि ढगालाही सांगावं की, "दादा, जेव्हा मी तिच्या जवळ जाईल ना तेव्हा एक मोठी गर्जना कर !,म्हणजे तिने आभाळाडे पहावं."
     आणि जशी तू वर बघशील ना... हळूच तुझ्या माथ्यावर उतरावं. तेव्हा तु ही तुझे डोळे मिटून घेशील आणि मलाही तुला भेटल्याच समाधान मिळावं.
     हळूच तुझ्या माथ्यावर चुंबन करून, तुझ्या गालाच्या दिशेने निघावं. डोळ्यांच्या बाजूने हळू-हळू रेंगाळत, तुझ्या गालावर येऊन स्थिरावं. नकळत तुझ्या ओठांवर हसू खुलावं, आणि गालावरच्या खळीमध्ये तुझ्या हळूच जाऊन निजावं. घ्यावी थोडी विश्रांती तिथे आणि मनातल्या मनात हसावं.
     पुढे गुरूत्वाकर्षणाचा नियम मोडंत हळूच तुझ्या ओठांकडे वळावं. ओठांना तुझ्या एक स्पर्श करून प्रेमाचा त्या गुलाबी रंगामध्ये रंगून जावं.
     शेवटी निरोप घेत तुझा हळूवार गतीने, तुझ्या हनुवटीला येऊन लटकावं. तेव्हा तू रुमालाने हळूच टिपून घेशील मला, आणि मी ही तुझ्याच हाताने संपावं.
     एवढे जरी आयुष्य मिळाले ना तुझ्याबरेबर घालवायला, तरी मी स्वतःला नशीबवान समजावं।...!
-----Jayjeet