जीव रडला

Started by sanket korde, October 27, 2016, 10:39:06 AM

Previous topic - Next topic

sanket korde

अजय अतुलच्या जीव दंगला
गुंगला गीतावरून तयार केलेली रचना

जीव रडला
अडला गुंतवला
का दुःखात देवा तू
देशिल का आता साथ
ध्यानी मनी माझ्या
मुखात देवा तू

पुणवेची गेली रात
आमावसेची आली
ही रात देवा
अंधारल जगण माझ
कोणाची ना आता
मला साथ देवा

येती लाटा टकरती
पार कशी करू
ही नाव देवा
तुला सगळ ठाव
कधी दाखवशिल
मला गाव देवा

समजेना कुणा
मी फिरतो दुःखाच
गीत गात देवा
रोज संकटांची बरसात
कशी करू या
संकटावर मात देवा

भेगाळली मने इथे आटली
मायेची ओल देवा
जातो माणसाचा
आता रोज तोल
गेल हरवून कुठे
माणुसकीच मोल देवा

तूच दे हात
विझत आहे
ज्योत देवा
खोट इथल सार नात
तूच आता दे
साथ देवा

संकेत