कविता II या भग्न मंदिरात , मग्न होऊन आरती करतोय II

Started by siddheshwar vilas patankar, October 27, 2016, 01:44:21 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

 

या भग्न मंदिरात

मग्न होऊन आरती करतोय

भित्तीचित्र खुणावतायत

दाखवतायत क्षीण भग्नता

चक्रपाणी मोडके हात घेऊन उभा

कधी कोसळेल सांगता येणार नाही

असा गाभारा

खांबावर  डोलारा सारा

विदारक सारे, पण दैदीपयमान इतिहास सांगणारे

इतिहासातली प्रसन्नता त्या भग्नावस्थेतहि कायम

ती विचित्र निरव शांतता , जळमटं , वेली

यांनीच खांद्यावर पेललेली रखवाली

वृक्षांनी घातलेला घेराव

अथपासून इथपर्यंत केलेला अभेद्य बचाव

निसर्गाचे अनोखे कर्तृत्व पाहून स्तंभित झालो

भग्नावशेष मनात साठवून

त्याच्या जीर्णोध्दारास लागलो

सिद्धेश्वर विलास पाटणकर C







सिद्धेश्वर विलास पाटणकर C