*** झोप हरवून गेली ***

Started by धनराज होवाळ, October 27, 2016, 06:38:01 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


🙇 *झोप हरवून गेली* 🙇🏼

जिंदगी माझी गं सखे,
बघ कशी बदलून गेली..
कामावर धावता धावता,
झोप माझी हरवून गेली..!!

आधी मला वेळ असायचा,
आता वेळेत सुद्धा मी नाही..
जीवनाशी लढता लढता,
तुझ्या गरजेस ही मी नाही..!!

धावपळीच्या या दुनियेत,
मी सर्वांना हरवून बसलोय..
आठवणीत रमता रमता,
मज वेडा ठरवून हसलोय..!!

सुख शांती या जीवाची,
बघ कशी बदलून गेली..
तुझ्यासाठी जगता जगता,
झोप माझी हरवून गेली...!!

नको मला असे आयुष्य,
तुझ्या मिठीत मला राहूदे...
मिठीत राहता राहता,
सारी जन्नत मला पाहुदे...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼🏻
(धनराज होवाळ)
कुंडल, जि. सांगली
मो.📲 ९९७०६७९९४९
🙏🙇🌹👼🌹🙇🙏