।।।....कोरा कागद....।।।

Started by Praj...., October 27, 2016, 07:32:29 PM

Previous topic - Next topic

Praj....

।।।....कोरा कागद....।।।

कोऱ्या कागदावर उतरवत होतो
भावना माझ्या निळ्या शाईच्या अक्षरात,
तुझं चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला
जे होत खूप दिवस माझ्या मनात....।

कोरा कागद निळा होत होता
भावना माझ्या समजत होता,
इतके दिवस जे कळाले नाही तुला
ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता....।

तुझी आठवण आली
डोळे पाणावले,
काही अश्रू त्या
अक्षरांन वर विराजमान झाले....।

पावसात करून द्यायचो
अश्रूंना मोकळ्या वाटा,
कागद व्हायचा समुद्र आणि
भावनांच्या निघायच्या लाटा.....।

तुला समोर पाहायचो
तेव्हा काही सुचायच नाही,
आजही कोरा कागद पहिला कि
तुझी आठवण आल्या शिवाय राहत नाही....।

#Praj 😘