कविता II माझे स्वप्न ठावं मला , साकार होणार नाही II

Started by siddheshwar vilas patankar, October 27, 2016, 07:53:48 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


माझे स्वप्न ठावं मला

साकार होणार नाही

माझ्या मनातला चित्कार

तुला कधीच कळला नाही

हृदयात तोडले मी स्वप्नांचे तारे

निवांत बसून विणले मोहजाल सारे

त्या जाळ्यात मीच अडकलो

माश्यावाणी एकला तडफडलो

तुला दोष नाही

हे दुर्दैव माझे

ह्या जन्मी पेलायचे मजला

तुझ्या स्वप्नांचे ओझे


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C