उत्तर

Started by शिवाजी सांगळे, October 27, 2016, 09:48:13 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

उत्तर

छतला फिरत असलेल्या पंख्यासोबत
मनातल्या विचारांनी सुद्धा
गिरक्या घ्यायला सुरवात केली,
फ्लैट मध्ये पंखे गरजेचे आहेत...
खिडक्या बंद असतात ना?
मग हवा येणार कशी?
ना कधी, ढगांआडून
जाणारा चंद्र डोकावतो
न चमचमणारी
एकादि चांदणी दिसत...
मच्छरांची गाणी मात्र
ऐकू येतात...
अंधारा सोबत...
अंधार बोलका असतो ना?
किती दूर वर आलो आहोत ना आपण?
निसर्गा पासून? किंबहुना
स्वतः पासून सुद्धा...
आठवतंय....? शेवटचे...
किती तारे मोजले होते?
संथ पाण्यावर...
केव्हां दगड भिरकावला होता?
बर्फावरचे रंग कधी चोखले होते?
माहित आहे... सर्वांचं
हेच उत्तर असेल...
आठवत नाही !

@ शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९