कविता II व्यथा वाढत असते अशीच , अजून एक कथा बनायची म्हणून II

Started by siddheshwar vilas patankar, October 28, 2016, 06:12:05 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


आपण पूर्वी लांब असुनी जवळ होतो 

आता जवळ येऊनही दूर

लग्न प्रथा असली तरी व्यथा आहे माझी

शिवधनुष्य पेलले तरी

कैक जीव मोडले लग्नानंतर

दोघेजण पुरते दुरावले

ती बोलते, तो हलतो

हलायचे म्हणून

केलेले लग्न टिकवायचे म्हणून

ती मागते, तो देतो

द्यायचे म्हणून

तो खेळत असतो भावनांशी

करतोय हे दाखवायाचे म्हणून

चालत असते आयुष्य असेच पुढे

चालायचे म्हणून

अंतर वाढत असते नकळत

वाढायचे म्हणून

ती वेड्या भ्रमात असते

मनाशीच हसत असते

हसायचं म्हणून

तो कधीच दूर गेलेला असतो

तरी रहात असतो जवळ

केवळ बंध निभवायचे म्हणून

व्यथा वाढत असते अशीच

अजून एक कथा बनायची म्हणून


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C