गुरुमूर्ती आली...

Started by Ankush S. Navghare, Palghar, October 29, 2016, 10:52:02 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

वाट पहात होतो
विनवण्या हि केल्या
ते येणार येणार म्हणून
किती रात्री गेल्या
तहान भूक गेली
बुद्धी जड झाली
विरहात त्यांच्या
शुद्धि हरपली
अचानक एक जण
निरोप घेऊन आला
ते येणार म्हणून
वर्दी देऊन गेला
तयारीला लागलो
सर्व घर झाडले
मनाच्या कप्यातलेही
जळमट काढले
चकाचक सारे
घर माझे झाले
आनंदाच्या भरात
रंगोळ्यांनी न्हाले
ती रात्र सरली
वाट माझी संपली
भाईंच्या रुपात
माझी गुरुमूर्ती आली
माझी गुरुमूर्ती आली...

.... अंकुश नवघरे