वाट

Started by Balaji lakhane, October 30, 2016, 09:53:00 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

------------------वाट-------------------

दाराकडे पाहत पाहत,
हि कविता लिहीत आहे.!
आज तुमच्या आठवणीच्या,
पुरात मी बुडत आहे.!

बाबा आज दिवाळी,
पणत्याची चमचम आहे.!
आज मात्र माझ्या,
मनाची पणती शांत आहे.!

तुम्ही बोलला होतात,
मला मी दिवाळीला येईनं.!
अचानक काय झालं वाट,
पाहत होतो आस लावून.!

आईचा चेहरा हि आज,
खुप हो उदास झालायं.!
तुमची चिठ्ठी मिळताच,
मनात गहीवरूनं आलयं.!

किमान बाबा दिवाळीला,
येवून भेटून जात जा.!
वर्षातून एक वेळेस तर,
मला मिठ्ठी मारून जात जा.!

किती दिवस अशीच ,
प्रतिमा पाहत बसणार आम्ही.!
वचन द्या हि कविता,
वाचून नक्की येणार ना तुम्ही.!

तुमच्यासाठी बाबा आईने,
लाडू केलेत बेसनचे.!
तुम्हीच आला नाहीत,
मनच होत नाही खायचे.!

माझे सर्वच मित्र बाबा,
खुषाल फटाके उडवत आहे.!
मी मात्र फक्त अन् फक्त,
बाबा तुमच्या आठवात आहे.!

बाबा आजी आजोबा,
पण लपून लपू रडत होते.!
तुम्ही येणार दिवाळीला,
दरवाज्या कडे पाहत होते.!

आत्याचाही फोन आलेला,
तुम्ही आला असाल म्हणून.!
समजताच आत्याला बारीक,
आवाज काढून दिला ठेवून.!

तुमचा फोन पण कधीच,
लागतच नाही बाबा.!
चांगला आहे म्हणून रोज,
चिठ्ठी तर लिहून कळवा बाबा.!

आमच्या सर्वांच्या जीवाची,
घालमेल होत असते रोजच.!
टि.वी वर पाहताच दहशतवादी,
हल्ला झाल्याचे फाटते ह्रदयच.!

बाबा सोन्याचा वाढदिवस आहे,
तुळशीच्या लग्नाच्या वेळेस पहिला.!
बाबा बाबा तेव्हा तर येवून
जा ना हो आम्हाला भेटायला.!

मला तुमचा बाबा खुप,
खुपच अभिमान वाटतो.!
माझ्या मित्रांना गर्वाने तुम्ही,
सिमेवर लढता म्हणून सांगतो.!

बाबा अश्रु गाळत गाळत,
हि कविता लिहीलो आहे.!
तुम्हाला पाहायला दारा कडे,
तुमची आस लावलो आहे.!

-----------बालाजी लखने(गुरू)-----------
             उदगीर जिल्हा लातुर
             भ्र.८८८८५२७३०४