दिवाळी विशेष

Started by Rupesh Gade, October 30, 2016, 10:21:39 PM

Previous topic - Next topic

Rupesh Gade

डोळ्याला टिपणारी अशी रात्र झाली,
सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन दिवाळी आली, कंदिलाच्या प्रकाशाखाली रांगोळीच्या विविध रंगाची एकच जात झाली,
तर चिमुकल्यांचा आनंद आणि थोरांचा आशीर्वाद हि दिव्याची वात झाली,
वेगवेगळ्या फुलांना घेऊन एक माळ ओवली,
तर प्रत्येक घरात दिसली लक्ष्मी ची सावली,
चिवडा, चकली आणि लाडू याचा वेगळाच स्वाद होता, आणि चिमुकल्यांच्या किल्यावर हि महाराजांचाच राज होता,
भाऊबीजेला बहिणीने जी साखर भरवली तिच्या समोर मिठाईची हि चव हरवली,
प्रत्येक सणा मध्ये दिवाळी हा सण वेगळाच असतो,
कारण या पाच दिवसानमधला एक एक क्षण माणूस आनंदाने जगतो,
हा असा क्षण तुमच्या आयुष्यात वर्षनूवर्ष राहू दे,
आणि प्रत्येक दिवाळी ला हा आनंद दुयगुनित होऊ दे.
                   ।।शुभ दिपावली।।
                                              - रुपेश मारुती गाडे.